समीक्षा झा या मार्था फॅरेल फाउंडेशनच्या कार्यक्रमांच्या प्रमुख व अनौपचारिक क्षेत्रातील महिला कामगारांसाठी सुरक्षित कामाच्या जागा व त्यांचे हक्क या बाबींचा पुरस्कार करणाऱ्या डेव्हलपमेंट प्रोफेशनल आहेत. त्या सहभागीय पद्धतींचा व सर्वायवर सेंट्रिक दृष्टिकोनांचा वापर करुन अनौपचारिक क्षेत्रातील महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सन्मान व सुरक्षा उपलब्ध व्हावी या बाबतच्या प्रयत्नांचे नेतृत्व करतात. PoSH कायदा, 2013 त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी आहे आणि परिवर्तन घडवून आणणे हा त्यांच्या कामाचा गाभा आहे.