दीपा पवार या एन. टी.-डी. एन. टी. कार्यकर्त्या, संशोधक, लेखिका, प्रशिक्षक आणि समुपदेशक आहेत. त्या घिसाडी या भटक्या जमातीच्या आहेत आणि त्यांनी स्थलांतर, गुन्हेगारी आणि सामाजिक असुरक्षिततेचे स्वत: अनुभव घेतले आहेत. त्या अनुभूति या जातीविरोधी, आंतरशाखीय स्त्रीवादी संघटनेच्या संस्थापक आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दीपा यांमी एन. टी.-डी. एन. टी., आदिवासी, ग्रामीण आणि बहुजन समुदायातील लोकांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामांमध्ये लिंगभाव, मानसिक आणि लैंगिक आरोग्य, स्वच्छता आणि घटनात्मक साक्षरता यांचा समावेश आहे. त्या उपेक्षित समुदायांसोबत चळवळ उभारणीवर देखील काम करतात आणि त्यांना त्यांचा इतिहास आणि वारसा परत मिळावा यासाठी मदत करतात.