सुवर्णा सुनील गोखले ह्या ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती ग्रामीण विभागाच्या प्रमुख आहेत. ग्रामीण महिलांसोबत काम करण्याचा 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सुवर्णा ह्या पदव्युत्तर पदवीधारक आहेत, त्या आणि त्यांच्या महिला स्वयंसेवकांच्या चमूने स्वयंसहाय्यता गट चळवळीअंतर्गत 100 गावांतील 4,000 हून अधिक महिलांना संघटित केले आहे. उपजीविकेसाठीच्या उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी, आरोग्यविषयक विषयांवर किशोरवयीन मुलींचे अनौपचारिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण आणि क्रीडा यांचा या उपक्रमांमध्ये समावेश आहे. सुवर्णा यांनी आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांमध्ये महिला सक्षमीकरणावर विपुल लेखन केले आहे.