विनिता गुरसहानी सिंग वी, द पीपल' अभियानाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. गेल्या 28 वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात, प्रामुख्याने उपजीविका, मानवी हक्क आणि सक्रिय नागरिकत्व ईत्यादी क्षेत्रात काम करत आहेत. ज्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागते त्यावर उपाय शोधण्यासाठी कौशल्ये, ज्ञान आणि दृष्टिकोन देऊन त्यांना सक्षम बनवून त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करण्यावर विनिता लक्ष केंद्रित करतात.